News Cover Image

महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती

*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित मध्यामिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती प्राचार्या श्रीमती जयश्री पवार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. श्री.वाय.डी. राऊत सर व श्री.सचिन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना लालबहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर.टी. गावित सर यांनी केले. तसेच कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी शालेय परिसर व ग्रामस्वच्छता विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*