News Cover Image

स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब यांची जयंती साजरी

*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे* 
🌹 *स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब यांची जयंती साजरी*   🌹
     🌷🌷🌷🌷🌷🌷🌷     बाऱ्हे -  दिनांक 01/04/2025 वार मंगळवार रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे *डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे माजी सचिव आरोग्यदूत,वाचनप्रेमी, क्रीडाप्रेमी,निसर्गप्रेमी, तसेच शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविणारे स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.* यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या, श्रीमती जे.पी. पवार मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती आपल्या भाषणातून सांगितली.तसेच शिक्षकांमधून श्री. नितिन अहिरे सर व श्री.आर.टी. गावित सर यांनी डॉ.विजयजी बिडकर साहेब यांच्या वैद्यकीय,शिक्षण क्षेत्रातील कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यालयाच्या प्राचार्या श्रीम.पवार मॅडम यांनी डॉक्टर साहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना  सविस्तर पद्धतीने सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गावित् आर.टी. सर. यांनी केले.आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे भाऊसाहेब व सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.